चहल म्हणतो असे काही नाहीच

भारतीय क्रिकेटपटू आणि अभिनेत्री यांच्यातील नातेसंबंध काही नविन नाही. त्यांच्या नातेसंबंधांच्या चर्चा बऱ्याचदा जोरदार रंगतात. अशीच चर्चा भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि कानडी अभिनेत्री तनिष्का कपूर यांच्या नात्याबद्दलही रंगल्यात.

चहलने मात्र या सर्व अफवा असल्याचे सोशल मिडियावर पोस्ट करून सांगितले आहे. त्याने म्हटले आहे की ” मला सांगायचे आहे की माझ्या आयुष्यात असे काही नाही. मी तनिष्काशी लग्न करणार नाही. तनिष्का आणि मी फक्त चांगले मित्र आहोत. “

“मी माध्यमांना आणि माझ्या चाहत्यांना विनंती करतो की अशा बातम्या पसरवू नका आणि त्याला व्हायरल करू नका. मला अपेक्षा आहे, तुम्ही माझ्या वयक्तिक आयुष्याचा आणि माझा आदर कराल. या अफवा थांबवा.”

माझ्या लग्नाविषयी पोस्ट करणे बंद करा, जे निरर्थक आहे. असे काही पोस्ट करण्याआधी खत्री करून घ्या.”

चहलला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने आयपीएल लिलावात राईट टू मॅच कार्ड वापरून 6 कोटी रूपये खर्च करून संघात कायम केले होते. चहलने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 5 सामन्यात मिळून 5 विकेट्स घेतल्या आहेत.

Leave your vote

0 points
Upvote Downvote