Album: विराट-अनुष्काच्या स्वागत समारंभाला क्रिकेटपटू, बॉलिवूड कलाकारांची हजेरी

भारतचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा काल मुंबईत स्वागत समारंभ थाटामाटात पार पडला.

लग्नानंतरचा पहिला स्वागत समारंभ दिल्ली येथे पार पडला होता. त्यावेळी अनेक राजकीय व्यक्तींनी त्या कर्यक्रमाला हजेरी लावली होती.

कालचा कार्यक्रम हा खास खेळाडू आणि बॉलीवूड कलाकारांसाठी ठेवण्यात आल्यामुळे खेळाडूंनी व कलाकारांनी आपल्या कुटुंबाबरोबर कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच वायरल होत आहेत.

या कार्यमाला सर्व बॉलीवूड इंडस्ट्रीच उतरली होती असे म्हणावे लागेल.

बॉलीवूड कलाकार रणवीर कपूर, शाहरुख खान, बिग बी अमिताभ बच्चन, संगीतकार ए आर रेहमान, कलाकार बोमन इराणी, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या रॉय बच्चन, कंगना राणावत आणि अभिनेत्री रेखा हे कलाकार कार्यक्रमात उपस्थित होते.

तर खेळडूंमध्ये स्टार खेळाडू एमएस धोनी, मुलगी झिवा आणि पत्नी साक्षी यांच्यासोबत उपस्थित होता. तसेच सचिन तेंडुलकर ही आपल्या कुटुंबासोबत कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होता.

सध्याचे भारतीय संघातील स्टार रोहित शर्मा, युवराज सिंग, भुनेश्वर कुमार, उमेश यादव आपल्या पत्नी सोबत कार्यक्रमात दिसून आले. तर साईना नेहवाल, जसप्रीत बुमराह, ईशान शर्मा, आर अश्विन, चेतेश्वर पुजारा, जयदेव उनाडकर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मनीष पांडे, माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.