Sou Shashi Deodhar – Shilpa Shirodkar to produce a Marathi Movie

Loading...

बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर ठसा उमटविणा-या मराठी अभिनेत्रीच्या यादीत शिल्पा शिरोडकर हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. एकाहून एक सरस लोकप्रिय चित्रपटांमधून आपल्या बहारदार अभिनय आणि नृत्य कौशल्याद्वारे शिल्पाने अल्पावधीत आघाडीच्या नायिकांमध्ये स्थान पटकावले होते. अभिनयातल्या दमदार कामगिरीनंतर शिल्पा शिरोडकर आता मराठी चित्रपटनिर्मिती करीत आहेत.
मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री मिनाक्षी शिरोडकर यांची नात असलेल्या शिल्पा आता ‘आँरेंज ट्री प्रॉडक्शन’ या निर्मिती संस्थेद्वारे ‘सौ.शशी देवधर’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करीत आहे. चित्रपटाच्या निर्मितीत शिल्पा शिरोडकर रणजित यांना त्यांचे पती अपरेश रणजित, नीता शेट्टी, कृष्णा शेट्टी यांचीही साथ आहे.
‘सौ.शशी देवधर’ असे उत्कंठा वाढविणारे शीर्षक असलेल्या ‘निडलड्रॉप प्रॉडक्शन्स’ प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन अमोल शेटगे करीत आहे. अजिंक्य देव, तुषार दळवी, अविनाश खर्शिकर आणि सई ताम्हणकर या कलाकारांच्या यात लक्षवेधी भूमिका आहेत. सुरेश पै यांची सहनिर्मिती असलेल्या ‘सौ.शशी देवधर’ चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच मुंबईत सुर करण्यात आले.
अमोल शेटगे लिखित चित्रपटाच्या कथेवर पटकथा शर्वणी -सुश्रुत यांनी लिहिली असून संवाद कौस्तुभ सावरकर यांचे आहेत. गीतकार अश्विनी शेंडे यांनी ‘सौ.शशी देवधर’ चित्रपटाची गीते लिहिली असून टबी-परिक चित्रपटाचे संगीतकार आहेत. छायांकन- सुरेश देशमाने यांचे तर कलादिग्दर्शन विनायक काटकर करीत असून चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सुरेश साळी सांभाळीत आहेत. ‘सौ.शशी देवधर’ या कलाकृतीद्वारे शिल्पा शिरोडकर यांचे मराठी निर्मितीत होत असलेले पदार्पण नक्कीच कौतुकास्पद आहे.

Loading...
You might also like

Comments are closed.