Ritesh Deshmukh To Host ‘Big Boss’ in Marathi

शह – कटशह,गोसिपिंग,कारस्थान,वाद-विवाद हे सगळे आपल्याला बिग बॉस च्या घरामध्ये पाहायला मिळते. हिंदीमधील बिग बॉसची वेगवेगळ्या भाषेत आवृत्ती निघत असताना आता बिग बॉस मराठी मध्येही येत आहे. अभिनेता-निर्माता रितेश देशमुख आणि स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे हे दोघे एकत्र येउन मराठी बिग बॉसची निर्मिती करणार आहेत. बिग बॉसचे मरठीत हक्क घेण्यासाठी विअकॉम १८ शी बोलणी सुरु आहे. मराठीतील बिग बॉसचे सूत्रसंचालन रितेश देशमुख करणार आहे.

‘बिग बॉस’ बद्दल बोलताना नितेश राणे म्हणाले कि ,”बिग बॉसमराठीमध्ये करण्याची फार दिवसापासून इच्छा होती,” ह्या बद्दल मी रितेश शी बोललो असता त्याला देखील हि कल्पना आवडली. आम्ही दोघेही कार्यक्रमाची मांडणी करत आहोत; मात्र आमचा ‘बिग बॉस’ हिंदी प्रमाणे वादग्रस्त किंवा आक्षेपार्ह असणार नाही.
‘बिग बॉस’ च्या माध्यमातून कलाकार आणि मनोरंजन क्षेत्राला नवी झळाळी देणार असल्याचा दावा नितेश यांनी केला. मराठी बिग बॉसमध्ये कलाकार, खेळाडू आणि राजकारन्यांचा सहभाग असेल.
मराठीतील बिग बॉसमध्ये सचिन-सुप्रिया पीळगावकर, अविनाश-ऐश्वर्या नारकर, महेश मांजरेकर,निर्मिती सावंत, अवधूत गुप्ते, भरत जाधव, पंढरीनाथ कांबळे,  भरत दाभोळकर यांच्या नावाचा विचार चालू आहे.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.