Loading...

khulja Sin Sim Upcoming Marathi Movie Muhurt Held At Mumbai

Loading...

खुलजा सिम सिम.. चित्रपटाचा शुभारंभ

Loading...

निर्माते मंगेश शिंदे आणि गणेश शाहू यांच्या बिग ड्रिमर्स मिडिया निर्मितीसंस्था प्रस्तुत आणि डिवाईन मोशन स्टुडिओज यांच्या सहकार्याने खुलजा सिम सिम या मराठी धम्माल विनोदी चित्रपटाचा शुभारंभ नुकताच मुंबईत पार पडला. अविनाश मिश्रा यांच्या कथेवर रमेश खाडे यांनी चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत तर हुप्पा हुय्या सारखे हिट मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल सुर्वे चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत, यावेळी  चित्रपटांतील कलावंत अदिती सारंगधर, गणेश यादव, तृषा पाटील आणि रंविद्र बेर्डे उपस्थित होते.यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल सुर्वे चित्रपटाविषयी म्हणाले की, अगदी खुलजा सिम सिम या नावाप्रमाणेच चित्रपटाच्या कथानकात अनेक गंमतीशीर घटना प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत, एका ग्रामीण भागातील चार उमद्या तरणांची ही कथा आहे, ज्यांची इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणेच काही स्वप्ने आहेत, त्यांना आपल्या आयुष्यात झटपट पैसा कमवायचा आहे, त्यासाठी ते चारही तरण कोणत्या मार्गांचा अवलंब करतात, पुढे त्यात ते यशस्वी होतात की नाही, हे सगळे करत असतांना त्यांच्या मैत्रीत अंतर पडते की नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरे चित्रपट पहातांना प्रेक्षकांना मिळणार आहेत, ते चार तरण कोण आहेत हे लवकरच समजेल…

Loading...
Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.