रवींद्र जडेजा आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आयसीसी कसोटी क्रमवारीत रवींद्र जडेजाने अश्विनला मागे टाकत अव्वल स्थानावर झेप घेतली तर चेतेश्वर पुजाराही कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च स्थानी विराजमान झाला आहे.
फिरकी गोलंदाज जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध घेतलेल्या ९ बळींचा त्याला आपले स्थान सुधारण्यासाठी फायदा झाला. जडेजाने रांची कसोटीमध्ये पहिल्या डावात ५ आणि दुसऱ्या डावात ४ बळी मिळविले होते.त्यामुळे जडेजाला ७ गुणांचा फायदा झाला. रांची कसोटीपूर्वी जडेजा आणि अश्विन संयुक्तपणे अव्वल स्थानावर होते.
२०२ धावांच्या सयंमी खेळीचा चेतेश्वर पुजाराला फायदा होऊन त्याचेही एकूण ८६१ पॉईंट्स झाले आहेत. पुजाराने न्यूजीलँडच्या केन विल्यम्सनची जागा घेत आयसीसी कसोटी फलंदाज क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. केन विल्यम्सन आता ५व्या स्थानी असून तिसऱ्या क्रमांकावरील ज्यो रूट आणि चौथ्या क्रमांकावरील विराट कोहली यांच्या स्थानात कोणताही बदल झालेला नाही.

जडेजाचे ८९९ पॉईंट्स हे जडेजाच्या कारकिर्दीतील सर्वोच्च असून जडेजा अश्विन नंतरचा दुसरा भारतीय आहे ज्याने ८९९ पॉईंट्सचा टप्पा पार केला. यापूर्वी अश्विनने ९०४ पॉईंट्सपर्यंत मजल मारली आहे.

आयसीसी कसोटी क्रमवारी
१. भारत १२१
२. ऑस्ट्रेलिया १०९
३. दक्षिण आफ्रिका १०७
४. इंग्लंड १०१
५. न्यूजीलँड ९८
६. पाकिस्तान ९७
७. श्रीलंका ९०
८. वेस्ट इंडिज ६९
९. बांगलादेश ६६
१०. झिम्बाब्वे ५

आयसीसी कसोटी गोलंदाज क्रमवारी
१. रवींद्र जडेजा ८९९
२.आर अश्विन ८६२
३. रंगना हेराथ ८५४

आयसीसी कसोटी फलंदाज क्रमवारी
१. स्टिव्ह स्मिथ ९४१
२. चेतेश्वर पुजारा ८६१
३. ज्यो रूट ८४८

आयसीसी कसोटी अष्टपैलू क्रमवारी
१. शाकिब-उल-हसन ४३१
२. रवींद्र जडेजा ४०७
३.आर अश्विन ३८७

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.