Loading...

Bhojpuri Actress Pakhi Hegde Interview

Loading...

स्त्रीप्रधान भूमिकांना प्राधान्य देणारी भोजपुरी अभिनेत्री पाखी हेगडे प्रथमच मराठीत

सत ना गत मध्ये “नामीच्या” आव्हानात्मक भूमिकेत

संवेदनशील अभिनयासाठी वेगळी ओळख असणारी भोजपुरीमधील आघाडाची सिनेतारका म्हणजे पाखी हेगडे.  45 हून अधिक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केलेल्या पाखी हेगडे यांनी गंगा मैय्या या चित्रपटात सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील अभिनय केला आहे. कन्नड भाषिक असलेल्या पाखी यांनी भोजपुरी सिनेमात स्वत:चा वेगळा ठसा उमटविल्यानंतर साई सागर फिल्मस् इंटरनॅशनल निर्मित, देविशा फिल्मस प्रस्तुत सत ना गत या चित्रपटाद्वारे मराठीत दमदार पदार्पण केलंय. अनेक पुरस्कारांवर मोहोर उमटविलेल्या
देऊळ आणि भारतीयच्या यशस्वी निर्मितीनंतर निर्माते अभिजीत घोलप यांची ही आगामी कलाकृती आहे. सुप्रसिध्द साहित्यिक राजन खान यांच्या गाजलेल्या कादंबरीवर आधारित सत ना गत हा चित्रपट येत्या 13 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होतोय या निमित्ताने पाखी हेगडे यांच्याशी केलेली ही खास बातचीत…
1. तुमच्या करीअरची सुरवात भोजपुरी चित्रपटातून कशी झाली?


Loading...

– भोजपुरी सिनेसृष्टीत आज जवळपास 40 हून अधिक चित्रपटांमध्ये मी काम केले आहे आणि हे सर्वच चित्रपट स्त्रीप्रधान भूमिकांवर आधारित होते. मै बनूंगी मिस इंडिया हा Pakhi-Hegade-Interview-For-Sat-na-Gatमाझा टीव्ही शो खूप गाजला. त्यामुळे कलेला भाषेचे बंधन नसते असे मी मानते, आणि त्यानुसार वैविध्यपूर्ण चित्रपटांमध्ये काम करण्याकडे माझा कल असतो. भोजपुरी, बिहारी आणि आता मराठी अशा माझ्या प्रवासात मी नेहमीच स्त्री प्रधान भूमिकांना प्राधान्य दिलं आहे. आगामी सत ना गत चित्रपटांमध्येही तुम्हाला त्याची प्रचिती येणार आहे.
2. सत ना गत मधील नामीच्या मध्यवर्ता भूमिकेविषयी काय सांगाल?


Loading...

– दिग्दर्शक राजू पार्सेकर यांनी मला याआधी गग्लॅमरस भूमिकांमध्ये पाहिले होते. त्यांनी मला नऊवारी गेटअपमध्ये यायला सांगून एक दिवसाचे चित्रीकरण करन सत ना गत मधील नामी कॅरेक्टरसाठी मी परफेक्ट असल्याचे सांगितले. कादंबरीचे कथानक मला आवडलेच शिवाय या चित्रपटाची संपूर्ण कथा नामी या व्यक्तिरेखेभोवती फिरत असल्याने या भूमिकेला मी लगेचच होकार दिला. अशाप्रकारे सत ना गत या आशयघन चित्रपटातून माझा मराठीत प्रवेश झाला.
3. नामीची व्यक्तिरेखा साकारतानाचा अनुभव कसा होता? काय विशेष मेहनत घेतली?


– नामीची व्यक्तिरेखा साकारताना मला कादंबरीची खूप मदत झाली. नामीच्या स्वभाव वैशिष्टयांचे कंगोरे, तिची मनस्थिती, सह कलाकारांनी दिलेल्या सुचना आणि दिग्दर्शक राजू पार्सेकर यांचे वेळोवेळी लाभलेले मार्गदर्शन यातून सत ना गत कादंबरीमधील नामी पडदयावर साकारली. मूळची मी वसईकर असल्याने मराठीशी माझे फार जुने ऋणानुबंध आहे. या भूमिकेसाठी कोल्हापूरी भाषेचा लहेजा हवा होता, तशी बोली भाषा आत्मसात करायला मला माझ्या असिस्टंटने मदत केली. नामीच्या भूमिकेसाठी मला अनेक तास बसून ग्रामीण लुक असणारा मेकअप करावा लागायचा, त्यातही नऊवारी साडीत काम करण्याचा हा अनुभव खूपच वेगळा होता.
4. मराठीतील आघाडीचे सुपरस्टार या चित्रपटात तुम्हाला सहकलाकार म्हणून लाभले याविषयी काय सांगाल?


– महेश मांजरेकर, भरत जाधव, सयाजी शिंदे हे सर्वच कलाकार अभिनयात आघाडीवर आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप शिकण्यासारखा होता. महेश सरांनी, दिग्दर्शक राजू पार्सेकर यांनी अभिनयातले अनेक बारकावे शिकवले ज्यांचा मला नेहमीच उपयोग होईल. भरत जाधव हे देखील सांभाळुन घेणारे सहकलाकार असून सेटवर त्यांचा वावर अगदी सहजसुंदर असतो. सगळ्यांनीच माझा पहिला मराठी चित्रपट असल्याने मला सहकार्य केले, या टीमसोबत काम करण्याचा अनुभव वेगळा होता.
Pakhi-Hegade-Bhojpuri-Actress-in-Marathi-movie
5. लवकरच सत ना गत हा चित्रपट प्रदर्शित होतोय, त्याविषयी प्रेक्षकांना काय सांगशील?


– भोजपुरीतील माझ्या अभिनयाची दखल प्रेक्षकांनी घेतलीच आहे, तशीच माझ्या 13 सप्टेंबरला प्रदर्शित होणा-या सत ना गत चित्रापटामधील मराठी अभिनयाची दखल रसिक प्रेक्षकांनी घ्यावी अशी इच्छा आहे. प्रेक्षकांनी सकस कथानकावर बेतलेला हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच पहावा आणि चित्रपटाला भरभरन प्रतिसाद दयावा हेच मी सांगेन..

Loading...
Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.