Avadhoot Gupte’s Musical Film “Ek Tara” First Poster launch

रईस लष्करिया प्रॉडक्शन्सचा संगीतमय ‘एकतारा’  च्या पोस्टरचे अनावरण

अवधूत गुप्ते यांचा अदभूत ‘गितारा’ लाँच

‘स्वराज्य.. मराठी पाऊल पडते पुढे’ या पहिल्या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर, ‘रईस लष्करिया प्रॉडक्शन’च्या आगामी ‘एकतारा’ या संगीतप्रधान चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण प्रसिध्द दिग्दर्शक एन. चंद्रा यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी निर्माते रईस लष्करिया, ‘एकतारा’चे दिग्दर्शक-संगीतकार अवधूत गुप्ते, दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेता मकरंद देशपांडे तसेच ‘एकतारा’ या चित्रपटाचे कलाकार संतोष जुवेकर, तेजस्वीनी पंडीत, उर्मिला निंबाळकर, सागर कारंडे उपस्थित होते. याप्रसंगी ‘एकतारा’ चित्रपटासाठी खास संगीत दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी निर्माण केलेल्या गितारा या वाद्याचे अनावरण दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
दिग्दर्शक एन. चंद्रा यांनी ‘एकतारा’ या प्रतिकात्मक शीर्षकाचे विशेष कौतुक केले. त्याबरोबरच ‘गितारा’च्या निर्मिती बद्दल आनंद व्यक्त केला. चित्रपट आणि संगीताबद्दलच्या विशेष प्रेमामुळेच एका सिनेमासाठी अवधूत गुप्ते यांनी वर्षभर संशोधन करन ‘गितारा’ हे वाद्य बनविले असल्याने हा चित्रपट यशस्वी होणार याची त्यांनी खात्री दिली. ‘सतत नवनवीन संकल्पनावर काम करणे आणि त्या अमलात आणणे हे अवधूतचे वैशिष्टय आहे. त्यांनी केलेल्या चित्रपटांची नावे ही सुध्दा अतिशय हटके आहेत. त्यामुळेच गितारासारखे वाद्य अवधूत गुप्तेच बनवू शकतो’, असे मनोगत व्यक्त करीत महेश मांजरेकर यांची अवधूत गुप्ते यांचे अभिनंदन केले.

मागील वर्षी 12/12/12 च्या दुर्मिळ मुहूर्तावर निर्माते रईस लष्करिया यांनी महत्त्वाकांक्षी चित्रपटांची घोषणा केली होती. त्या घोषणेची पूर्तता होत असल्याने याप्रसंगी समाधान व्यक्त केले. तसेच ‘एकतारा’ चित्रपटाचे चित्रीकरण 50 टक्के पूर्ण झाले असून 6 डिसेंबर 2013 ला हा चित्रपट प्रदर्शित करणार असल्याचे जाहिर केले. मकरंद देशपांडे यांनी ‘एकतारा’ चित्रपटाच्या निर्माता-दिग्दर्शक व्दंयीला शुभेच्छा दिल्या.
संगीतावर असलेल्या प्रेमापोटी व त्यात नावीन्य आणण्याच्या दृष्टीने अवधूत गुप्ते यांनी ‘रईस लष्करिया प्रॉडक्शन’च्या सहकार्याने ‘गितारा’ची निर्मिती केली असल्याचे स्पष्ट केले. कथा लेखन करीत असतानाच मला एक वेगळा ध्वनी ऐकू यायचा. कधी तो एकताराचा असायचा तर कधी गिटारचा. इलेक्ट्रीक गिटार आणि पारंपरिक ‘एकतारा’ या दोन्ही वाद्यांचे अनोखे सुरीले फ्युजन म्हणजेच ‘गितारा’. वर्षभर गितारासाठी संशोधन करून गिताराची अधिकृत नोंदणी केली असून पेटंट मिळवण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यास दोन वर्ष इतका कालावधी लागणार आहे.
नरेंद्र साळसकर यांच्या ‘गितारा’ वादनाने या कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली. एकताऱ्या चा भोपळ्यासारखा गोलाकार आणि त्याच्या लाकडी पट्टीमागे इलेक्ट्रीक गिटारचा, फ्रेट असे नवनिर्मित ‘गितारा’चे स्वरूप असून सुनील शिंदे यांनी अवधूत गुप्तेंच्या संकल्पनेतून बनविला आहे. आजमितीला उपलब्ध असलेल्या देशी, विदेशी वाद्यांच्या यादीत ‘गितारा’ ही आपले स्थान पक्के करील आणि त्याची मोहक सुरावट तमाम संगीतप्रेमींना भुरळ पाडेल यात शंका नाही.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.